अशा या श्रीमंती पेयाचा शोधही एका सम्राटाने लावला होता. सम्राट शेन नुंग असं त्याचं नाव होतं. एकंदरीतच इतिहासाची पानं उलटली तर चहाला सम्राटांचा चांगलाच वरदहस्त लाभला होता, हे लक्षात येतं. सकाळच्या वाफाळत्या चहाशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि दिवसभरही आपली गाडी चालू राहण्यासाठी चहाचं इंधन टाकतच राहावं लागतं. मरगळलेल्या मनाला तरतरी येण्यासाठी या अगदी प्राथमिक गुणापासून ते चहाचे अनेक औषधी गुण, अशा चहाच्या उपयोगांच्या निमित्तानं चहा कायम चर्चेत असतो. त्याचबरोबर चहातील अपायकारक घटकांबद्दलची चर्चाही सातत्यानं डोकं वर काढत असते. अर्थात याचा अट्टल चहाबाजांवर ढिम्म परिणाम होतो, ही गोष्ट अलाहिदा. त्यामुळे चर्चा करणारे आणि न करणारे आकंठ चहात बुडालेले असतात. चहा हा असा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. कुठेही, कधीही चहा आपल्यासमोर हजर होत असल्यामुळे चहाचं तसं अप्रूप मनात नसतं. पण एक काळ असा होता की, चहाच्या मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण व्यस्त असल्यामुळे चहाचा तुटवडा होता आणि त्यामुळे चहा चक्क लिलावानं विकला जात असे. म्हणजे पेटवलेली मेणबत्ती एक इंच जळेपर्यंत लिलावाच्या बोली घेतल्या जात असत. त्यामुळे चहाच्या किमतीतही खूप तफावत असे. एवढंच नाही तर आज ज्या प्रमाणे चरस-गांजा यांची तस्करी होते, तशी अठराव्या शतकापर्यंत चहाची तस्करी होत असे. तस्कर लोकांनी जिवावर बेतणारी जोखीम ज्या वस्तूसाठी पत्करली होती, ती वस्तू म्हणजे चहा. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचं पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन हिच्याशी लग्न झालं, तेव्हा तिनं हुंडा म्हणून आणलेल्या वस्तूंमध्ये चहाचा समावेश होता. ती स्वत: चहाची भोक्ती असल्यानं तिनं चहापानाचे कार्यक्रम आयोजित करून चहापानाची पद्धत रूढ केली. अशा या श्रीमंती पेयाचा शोधही एका सम्राटाने लावला होता. सम्राट शेन नुंग असं त्याचं नाव होतं आणि इ. पूर्व तीन सहस्र वर्षे या काळात त्यानं चहाचा शोध लावला. एकंदरीतच इतिहासाची पानं उलटली तर चहाला सम्राटांचा चांगलाच वरदहस्त लाभला होता, हे लक्षात येतं. हान राजकुलाच्या सम्राटाच्या थडग्यांचे उत्खनन केले असता त्यात चहा सापडला आहे. चीनमधील टॅंग राजकुलातील एका सम्राटाला भेटीदाखल मिळालेला चहा इतका आवडला की ज्याच्याकडून त्याला ही चहाची भेट मिळाली होती, त्याला त्यानं वर्षभर पुरेल इतका चहा पुरवण्याचं फर्मान काढलं आणि त्यातला सर्वोत्तम भाग स्वत:साठी ठेवून उरलेला वाटून टाकला. यथा राजा तथा प्रजा, तसं हे सगळे चहाच्या इतक्या आहारी गेले की प्रतिवर्षी चहाची मागणी वाढतच गेली. सम्राटाला लागणाऱ्या शाही चहासाठी लागणारी पानं खुडायचीही एक पद्धत होती. विस्तारभयास्तव ही पद्धत सविस्तरपणे देता येत नाही. अनेक शतकं बीयर हे ब्रिटिश जनतेचं आवडतं पेय होतं. त्यामुळे चहावर टीकेचा भडिमार झाला. चहाबाज आणि चहाविरोधी लोकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. त्याचप्रमाणे फक्त पुरुषानाच चहा प्यायचा असलेला अधिकारही धुडकावला गेला आणि चहा समाजातील सर्वांपर्यंत पोहोचला. पूर्व आफ्रिकेत चहाच्या मळ्यात काम केलेल्या रॉय मॉक्सहॅमच्या Tea — Addiction, Exploitation and Empire या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे, आनंद अभ्यंकरयांनी. या पुस्तकातील माहितीच्या खजिन्यानं त्यांना भुरळ घातली आणि त्यांनी अनुवाद करायचं ठरवलं. त्याचप्रमाणे कॉन्टिनेन्टलच्या अनिरुद्ध कुलकर्णीनाही हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्यांनी प्रकाशनाची जबाबदारी घेतलीच, पण त्यात भारतातील चहा उत्पादनासंबंधी एक प्रकरणही त्यात समाविष्ट करावं अशी सूचनाही केली. दुर्दैवानं त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि पुस्तक ते बघू शकले नाहीत. पण त्यांच्या पश्चात त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या त्यांच्या कन्येनं म्हणजे देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतली आणि चहाची उत्पत्ती-प्रगती-प्रवास-इतिहास, याचा खूप सविस्तर आढावा घेत चहाची लागवड-प्रक्रिया-तोडणी-प्रतवारी, चहा-क्षेत्रातील अर्थव्यवहार, चहाच्या मळ्यातील भीषण व्यवस्थापन-मजूर संघर्ष, चहावरून उठलेली वादळं-हल्ले-आंदोलनं.. आणि या निमित्तानं इ. पूर्व काळातील साम्राज्य, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक-आíथक परिस्थिती, अशी अनेक वाटा-वळणं घेत विविध प्रकारच्या माहितीचा खजिना असलेलं एक उत्तम पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचलं. पाणी उकळत ठेवलेल्या भांडय़ाच्या कडेला एखादा झरा वाहताना जसा मंद खळखळतो, तसा मंद आवाज आला आणि उकळणाऱ्या पाण्यात येणारे बुडबुडे एखाद्या मोत्याच्या मालेप्रमाणे दिसले म्हणजे ओळखावे की ते दुसऱ्या स्तरावर पोहोचले आहे. जेव्हा उकळणारे पाणी भारदस्त लाटेप्रमाणे उसळते आणि भरतीच्या फुगलेल्या लाटेप्रमाणे आवाज करते तेव्हा ओळखावे की पाणी त्याच्या परमोच्च स्थितीला पोहोचले आहे. यापेक्षा ते जास्त उकळले गेले तर ते वापरू नये. चहाचे भांडे आणि विस्तव असलेली शेगडी ज्या गाडीवर ठेवली जात असे, त्या गाडीची चाके संत्र्याच्या सालीपासून बनविलेली असावी. पाणी गाळण्याचे कापड हे पाचूच्या रंगाचे असावे आणि हे कापड खंड्या पक्ष्याच्या पिसांनी अथवा रुप्याच्या तारांनी बनवलेल्या नक्षीकामानं सुशोभित केले असावे. यातून चहा तयार करण्याची एक अत्यंत सुंदर आणि रमणीय अशी प्रतिमा निर्माण झाल्याखेरीज राहात नाही आणि चहातलं काव्य जाणवल्याखेरीज राहत नाही. सम्राट ह्युई त्सुआंग यानं चहावर प्रबंध लिहिला. चहाबद्दल उपलब्ध साहित्यातील हाही एक महत्त्वाचा ऐवज मानला जातो. घोड्याच्या बदल्यात चहा देणे ही पद्धत टॅंग साम्राज्यात अस्तित्वात आली असली तरी मिग साम्राज्यात तिनं जोर धरला. याच साम्राज्याच्या काळात सुगंधित चहाची फुलांचा सुगंध देऊन तसेच काळ्या चहाची पद्धतही सुरू झाली. त्या काळात ब्रिटिशांना लागणारा चहा चीनमधून येत असे आणि चिनी लोकांना या चहाच्या बदल्यात चांदी हवी असे, जे ब्रिटिशांना परवडणारं नव्हतं. कारण चहाचा खप वाढल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी देशाबाहेर गेली तर चलनाचा आधार कमी होईल, ही भीती होती. त्यावर ब्रिटिशांनी उपाय शोधून काढला तो कापसाच्या रूपात. कारण खूप मोठं क्षेत्र चहाच्या लागवडीखाली आल्यामुळे चीनमधील कापसाचं उत्पादन खालावलेलं होतं आणि भारतात मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन होत होतं. त्या वेळेस भारत ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता, याचा फायदा घेत ब्रिटिश कापूस चीनला विकत, त्या बदल्यात चांदी खरेदी करत आणि तीच चांदी विकून चहा खरेदी करत. पण चीनची कापसाची मागणी ब्रिटिशांच्या चहाच्या मागणीच्या तुलनेत खूपच कमी होती, म्हणून ब्रिटिशांनी अफू विकण्यास सुरुवात केली. जो चहा मिळवण्यासाठी ब्रिटिशांना इतके सव्यापसव्य करावे लागले, त्या चहाचा भारतात शिरकाव झाला तो सी. १८३६ च्या नोव्हेंबर महिन्यात सादियात बनवलेल्या चहाचा पहिला नमुना कलकत्त्यात आला. आसाम आणि ईशान्य भारतात चहाचे मळे फुलले. या मळ्यात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर होती, त्यानुसार मजुरांची भरती झाली. पण या मजुरांची अवस्था किती भयावह होती, त्यांचं जीवन किती खडतर होतं, व्यवस्थापक आणि मजूर यांच्यातील संबंध किती भीषण होते, हे कल्पनेपलीकडचं आहे. अशी सुरुवात होऊन एकोणिसाव्या शतकाअखेर चहाचे उत्पादन सुव्यवस्थापित पद्धतीनं होऊ लागलं. पण त्यासाठी भयानक किंमत मोजावी लागली होती, ही दुर्दैवाची बाब आहे. चहाबद्दलची माहिती ठासून भरलेलं हे पुस्तक सहज म्हणून वाचायला घ्यावं असं नक्कीच नाही. तरच या पुस्तकाचा आनंद घेता येईल. आज चटपटीत भाषेतल्या आणि मोजक्या शब्दात लिहिलेल्या लिखाणाला मागणी आहे. भारतात जसा दूध आणि साखरेचा चहा, ब्रिटनमध्ये हाय टी, चीनमध्ये ग्रीन टी, जपानमध्ये माचा टी लोकप्रिय आहेत तसेच इतर काही देशांत चहाचे वेगवेगळे प्रकार लोकप्रिय आहेत. जगभरात पिला जाणारा चहा तितक्याच विविधतेने बनविला जातो. चहाचे विविध प्रकार जाणून घेण्यासाठी अमेरिका: आईस टीअमेरिकेत सगळ्यात जास्त प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा. अमेरिकन लोक थंड चहा पितात, यालाच आईस टी ice tea म्हणतात. काळा चहा बनवून, त्यात बर्फ टाकून तो थंड केला जातो. मग त्यात चवीनुसार साखर घातली जाते. आवडीनुसार फळांचे तुकडे बारीक करून यात टाकतात. सन टी :विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या आईस टीच्या सुधारित पद्धतीचा विकास झाला. थंड पाण्यात चहाच्या पिशव्या टाकून, चहाचा जग काही तासांसाठी सूर्य प्रकाशात ठेवला जातो आणि चहाचा रस थंड पाण्यात उतरतो. त्यानंतर हा चहा प्यायला जातो. रशिया : समोवर चहा हा रशियातला सर्वात लोकप्रिय पेय आहे आणि तो रशियाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. रशियन लोक दिवसभरात कधीही चहा पितात, मुख्यत: जेवणानंतर. रशियन चहा संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे समोवर. हे एक चहा बनवायचं पाणी तापवायच्या बम्बासारखा सुंदर, रेखीव भांड आहे. हे रशियन आदरातिथ्याच प्रतिक आहे. या समोवरात चहासाठी लागणारं पाणी तापवलं जातं. एका चहाच्या किटलीत खूपच कडक काळा चहा बनवलेला असतो. चहाच्या कपात हा कडक कोरा चहा सर्वांना दिला जातो आणि मग चवीनुसार त्यात समोवाराच्या नळातून गरम पाणी घेतले जाते. लिंबू, मध किंवा जाम चहामध्ये आवडीनुसार घेतला जातो. तिबेट: लोणी आणि मीठाचा चहा तिबेटमध्ये चहा एकदम वेगळ्याप्रकारे बनवला जातो. तिबेटमध्ये ग्रीन टी वापरला जातो. प्रथम ग्रीन टी कुटून बारीक केला जातो आणि हा बारीक ग्रीन टी गरम पाण्यात उकळवून, गाळून घेतात. नंतर या ग्रीन टीमध्ये याकचे दूध, लोणी आणि मीठ टाकून घुसळतात. नंतर हा चहा किटलीत भरून ती किटली तापायला ठेवतात. हा चहा कश्मिर मध्ये प्रचलीत आहे. मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर अथवा शम्मी कपूर ची गाणी असतील तर सोने पे सुहागा हा चहा मजेत चाखत माखत प्यायचा.. उगाच घिसड घाई चालत नाही. वेलदोडे ठेचुन त्यात टाकावे २ केसर थोडे पाण्यात भिजवुन ठेवावे. ३ पाणी उकळल्यावर त्यात गाळणीत २ चमचे चहा पत्ती आणी ठेवुन गाळण चहा भिजेल इतपत पाण्यात बुडवुन ठेवावी. ४ ३ ते ५ मिनीटानी चहाचा पाण्याचा रंग सोनेरी झाल्यावर गाळण बाजुला काढावी. जास्त कडक हवा असल्यास जास्त वेळ ठेवावी ५ या सोनेरी चहामधे ४ ते ५ चमचे मध टाकावा. गोडी वाढवु शकता ६ किंचीत मीठ टाकावे आवडत असल्यास थोडेसे लिंबु पिळावे ७ केसर मिश्रीत पाणी टाकावे. दोन चमचे मस्त मोठ्या कपात गरम गरम असतानाच भरुन द्यावे ७ वाढताना त्या हवे असल्यास किसलेला बदाम वरुन टाकावा. त्यावेळी त्यात स्मिर्नोफ व्होडका चा एखादा चमचा टाकल्यास हरकत नाही. काहवा मुळात अरबस्थानातील कॉफी आहे. ही प्रकृतीला थंड असते. कॉफीच्या बिया आणि वेलची एकत्र दळून पावडर बनवतात. काहवा करताना साखर घालणे अथवा न धालणे ऐच्छिक आहे. आलेल्या पाव्हण्याचे आदरातिथ्य खजूर आणि काहवा देऊन करतात. खजूर उष्ण असतो तो बाधू नये म्हणून काहवा देतात. पारंपारीक पद्धतीत यजमान Host पाहुण्यांना काहवा एका छोट्या कपात एक किंवा दोन घोट साईझचा कप देतो. तेवढा पाहुण्याने प्यायला की पुन्हा तो कप भरतो. कप भरला की प्यावा लागतो. नाहीतर यजमानांचा अपमान होतो. काहवा नको असेल म्हणजे पहिल्या कपानंतर तर कप, आपण देवासमोर घंटा वाजवतो तसा किंचित हलवायचा आणि खाली ठेवायचा. म्हणजे यजमानास समजते की पाहुणा आदरातिथ्याने तृप्त झाला आहे. नाहीतर तो कप भरतच राहतो. पुदीना चहा सुद्धा सुंदर लागतो. उकळत्या पाण्यात चहा पावडर थोडी कमीच आणि साखर घालायची. आवडी प्रमाणे २-३ पाने ताजा पुदीना घालायचा आणि चांगला उकळला की २-३ थेंब लिंबू रस घालून गॅसवरून उतरवायचा. गाळून कपात घ्यायचा आणि घोट घोट घुटके घेत एन्जॉय करायचा. सर्व चहाच्या चाहत्यांना प्रेमपूर्वक अर्पण!!! चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो, पृथ्वीवरच्या सर्व पेयांचा तो बादशहा असतो! तुमच्या माझ्यासाठी, आपणा सर्वांसाठी आनंदाचा झरा असतो! चहा केव्हाही प्यावा —— सकाळी सुस्त शरीरात जोम येण्यासाठी प्यावा , संध्याकाळी श्रमपरिहारार्थ प्यावा! थंडीची हुड़हुड़ी घालवण्यासाठी प्यावा, घामाच्या धारा वाहत असतानाही प्यावा, पावसाळी कुंद हवेत प्यावा , मित्रां बरोबर धमाल करतांना प्यावा. चहा खुशीत असतांना प्यावा,अन निराश अवस्थेत तर प्यावाच प्यावा! चहा जागून अभ्यास करतांना प्यावा, ऑफिस मधे मीटिंग चालू असतांना प्यावा, आवडतं पुस्तक वाचता वाचता प्यावा ,आणि कविता करतांनाही प्यावा! चहा कसाही प्यावा ——- घरातल्या छोट्या कपातून किंवा मोठ्या मगातून, किंवा टपरीवरच्या प्लास्टिक ग्लासातूनही प्यावा बशीत ओतून फ़ुर्र करत प्यावा ,किंवा दिवसभर घोटघोट प्यावा! कमी साखरेचा,वा बिनसाखरेचा प्यावा, उकळून दाट केलेला बासुंदी सारखा प्यावा किंवा पत्ती चहा लिंबू पिळून प्यावा, वेलदोडा, सुंठ घालून प्यावा किंवा नुसताच प्यावा! चहा कुणीही,,केंव्हाही, कसाही, कुठेही, कितीही प्यावा —— कारण चहा हे केवळ एक पेय नसतं ,ते पृथ्वीवरचं अमृत असतं!! तुम्हा -आम्हाला सर्वांनाच आवडणारं असतं … समस्त चहाप्रेमींना सादर समर्पित अलीकडील टिप्पण्या vishnu kadbhane च्यावर Mr Pravin Jawale च्यावर j j janale च्यावर D. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. याच अनमोल, अफाट, बेलाग आणि राकट सह्याद्रीच, सह्याद्रीतील गिरिशिखरांच आणि गिरिशिखरांवर असलेल्या पावन-पवित्र गडकोंटाच , इथल्या जाज्वल्य इतिहासाशी अतूट अस नात आहे. याच सह्याद्रीतील गडकोट किल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उंच, प्रचंड, दुर्गम डोंगर, वेड्यावाकड्या ऊंचच उंच डोंगररांगा, आणि अफाट, बेलाग सह्याद्री. विविध समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. या समाज माध्यमातून अनेक लोक त्यांचे लेख, कविता, गझल्स, फोटो इ. कलाकृती पोस्ट करत असतात. आणि या माध्यमाच्या वेगाची गती पाहता त्या कलाकृती वाऱ्याच्या वेगाने जगभर पसरत असतात. हा प्रसार होत असताना ती कलाकृती मूळ निर्मात्याच्या नावाने पुढे जाईल असे होत नाही. पण लक्षात कोण घेतो? माझा प्रवास अथवा विष्णुभट गोडसे, प्रवासवर्णन१८५७ च्या बंडाची हकिकत९. प्रश्न : — आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय? बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते. हे अंगात येणे म्हणजे नेमके काय असते? अंगात येण्याचा हा प्रकार बहुदा देवाच्या, देवीच्या आरतीच्या वेळी, पालखीच्या वेळी घडताना दिसतो. महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. त्यांना सामाजिक कामाची आवड त्यांचे गुरुजी सोमण मास्तर यांनी लावली. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली.