दव डोळ्यातला लपवतेस कशाला
पर्ण पापण्यांना फसवतेस कशाला
कळ्या गुलाबी ओठ ते,शब्द गुलाबी
गुलाब तो,केसात सजवतेस कशाला
काटा एक इथे रुतला, दाह मखमली
जख्माना त्या उगाच भरवतेस कशाला
पुन्हा बहरून येते, नव्या ऋतूत सारे
दुखःस त्या मैफिलि बसवतेस कशाला
एकटेच फुलणे जर आवडते तुला सखे
नात्यांचे गाव नवे वसवतेस कशाला........